१-
आपल्या
सर्वांसाठीच -
दहशतवादाचा
धर्माशी आणि धर्माचा दहशतवादाशी संबंध असतो हे सत्य आपण एकदाचं मान्य करूया.
धार्मिक व्यक्ती दहशतवादी असू शकतात आणि दहशतवादीही धार्मिक असतात हेही आपण एकदा
मान्य करूया. कारण धर्माचा आणि चांगूलपणानं वागण्याचा किंवा न वागण्याचा काही एक
संबंध नसतो. या गोष्टी कोणासाठी कितीही क्लेशकारक असल्या तरी त्या सत्य आहेत आणि
त्याचा स्वीकार केल्यानं आपल्या समस्या सोडवण्यासाठी आपण अधिक मुक्त होऊ शकतो.
त्यामुळे आयसीस, तालीबाँ, अल-कायदा आणि अन्य संस्था आणि त्यांचे तथाकथित जिहादी हे
मुस्लिम दहशतवादाचे पुढारी आहेत हेही आपण स्वीकारूयात. या दहशतवादाशी आपला संबंध
काय आणि त्यांच्या भानगडीत आपण कशाला लक्ष घालायचं असा विचार करणं आता शक्य नाही.
बांग्लादेशात मारले गेलेले बहुतेक परकीय नागरीक होते. त्यांचं त्या दहशतवाद्यांशी
काहीही शत्रूत्त्व नव्हतं. पण ते केवळ मुस्लिम नाहीत म्हणून त्यांना मारलं गेलं.
धर्म आणि देश यांच्या सीमारेषा मोडणारी ही घटना आहे. जिचा आपल्याशी अगदी जवळचा
संबंध आहे. हे सारं काही उद्या अगदी आपल्याबाबतीतही घडू शकतं. आपल्या मित्रांच्या
बाबतीतही घडू शकतं. आणि मुस्लिम समुदायानं कितीही नाकारण्याचा प्रयत्न केला आणि
त्यांनी कितीही आपला इस्लाम धर्म हा शांततेचा धर्म आहे याचा नारा दिला तरीही
त्यांना त्यांची जबाबदारी टाळता येणार नाही. इस्लाम शांतीचा धर्म आहे अशी त्यांची
समजूत असेल आणि त्यावर त्यांचा विश्वास असेल तर ते त्यांना कृतीतून सिद्ध करावं
लागेल.
इस्लामची
स्थापनाच मूळात हिंसक प्रतिक्रियेतून झालेली आहे. तरवारीच्या बळावरच हा धर्म जगभर
पसरला. शांतीचा धर्म म्हणून ज्या इस्लामची महती गायीली जातो तो इस्लाम नंतरच्या
काळात जन्माला आला. पण त्याचा इतिहास पैगंबरापासून केवळ रक्तानेच लिहिला गेलेला
आहे हे नाकारण्यात अर्थ नाही. पैगंबर व त्यांच्या अनुयायांनी जे केलं ते
त्यांच्यासोबत संपूष्टात आलं आहे. काळ बदलला आहे आणि त्या जुन्या गोष्टी आजच्या
काळात योग्य ठरू शकत नाही व त्यांची पुनरावृत्ती ही कधीही कोणत्याही कारणासाठी
योग्य व क्षम्य मानली जाऊ शकत नाही. बहुसंख्य मुस्लिमांची अडचण ही आहे की काळ
बदलला आहे आणि त्यामुळे इस्लामची गरजही त्यानुसार बदलली पाहिजे हे त्यांच्या
लक्षातच येत नाहीय. धर्माच्या बाबतीत ते अजूनही पैगंबराच्या काळातच जगत आहेत.
त्यांचा बाह्य वावर आधुनिक जगात आणि आंतरीक वावर मात्र त्या गतकाळातच आहे. ही
दुहेरी मानसिकता ते बदलणार नाहीत तोवर हा तिढा सुटणार नाही. मुल्लामौलवींच्या
मूर्ख समजूतींपासून ते स्वतःला दूर ठेवणार नाहीत आणि त्याचा विरोध करणार नाहीत
तोवर हा समाज प्रागतिक होणार नाही. मुस्लिम देशांकडे अमाप संपत्ती आहे पण
विचारांच्या बाबतीत ते दरीद्री आहेत हे त्यांनी समजून घेतलं नाही तर हा दहशतवाद
त्यांच्याच मूळावर उठणार आहे आणि त्याची सुरूवातही झाली आहे.
कोणत्याही
सामाजिक प्रगतीला असलेला विरोध, महिलांच्या बाबतीत कायम हीन धोरण, कमालीचा एकांगिक
आत्मश्रेष्ठत्वाचा अहंकार यामुळे हा समाज इतरांपेक्षा वेगळा पडतो. नव्हे तसं
वेगळेपण जपण्यातच त्यांनी धन्यता मानली आहे. पण या वेगळेपणाच्या नादात ते जगापासून
वेगळे होत आहेत याचा त्यांना विसर पडतोय. ज्या कोणत्याही धर्मांनं हे केलं ते
नामशेष झाले आहेत किंवा त्याची जबरी किंमत तरी मोजली आहे. हिंदूंनी अस्पृष्यता,
जातीवाद यापायी ही किंमत मोजली होती. पण सुदैवानं यात कायम महान समाजसुधारकांचा
जन्म होत राहिला ज्यांना आणि ज्यांच्या विचारांना सामान्य जनतेनं पाठींबा दिला.
नंतरच्या काळात आणि आजही हिंदूंमध्ये समाज सुधारणेचा झरा कायम वाहता राहिला आहे.
त्यामुळे या धर्मात अनेक वाईट गोष्टी असल्या तरी त्याला विरोध करणारे प्रबळ
विरोधकही असल्याने हिंदू समाजाची अवनती होण्याची शक्यता नाही. मुस्लिम मात्र याला
अपवाद होतील अशी चिन्हं दिसताहेत. आपल्या घरातली घाण साफ करायला आधी आपण सुरूवात
करायची असते, ती नाही केली आणि त्यामुळे बाहेरच्या लोकांना त्रास व्हायला लागला तर
लोक शिव्या देणारच. मुस्लिम समाजात ज्या लोकांनी सुधारणेची कामं करू पाहिलीत
त्यांना अतोनात त्रासच दिला गेला. आजही मुस्लिम समाज सुधारणा अत्यंत अवघड गोष्ट
आहे. याचा आता यांनीच विचार करायला पाहिजे.
कुराण
जगातलं एकमेव धार्मिक पुस्तक नाही, इस्लाम जगातला एकमेव धर्म नाही आणि पैगंबर
जगातला एकमेव प्रेषित नाही हे मुस्लिमांनी मान्य करायलाच पाहिजे. जे मुस्लिम नाहीत
ते जगण्यास नालायक आहेत, त्यांना मेल्यावर स्वर्ग मिळणार नाही ही असली भंपकबाजी
आता त्यांनी बंद करावी. दिवसातून पाचदा नमाज पढणा-या आपल्या पोरांचा उदो उदो
करण्यापेक्षा त्याचं शिक्षणाकडे लक्ष आहे की नाही, तो स्वतःचं पोट भरण्यासाठी लायक
आहे की नाही याचा जास्त विचार मुस्लिम पालकांनी करण्याची गरज आहे. आपल्या बायकांना,
मुलींना सन्मान देण्याची गरज आहे. स्वतःचं वेगळेपण जगण्याच्या नादात इतरांपेक्षा
आपण वेगळे पडणार नाहीत याची काळजी घेण्याची ही वेळ आहे. आणि पाखंडी मुल्लांपेक्षा
स्वतःच्या अकलेनं जगण्याची त्यांना आवश्यकता आहे. त्यांच्या वागण्या बोलण्यातून
आचाराविचारांतून जोवर हा धर्म जाणार नाही तोवर त्यांची सुधारणा होणं अशक्य आहे.
आणि तोवर हा दहशतवादही संपूष्टात येणार नाही. कारण याचा संबंध या एरव्ही नगण्य
भासणा-या गोष्टींशीच आहे. आजवर इतरांनी खूप सांभाळून घेतलंय मुस्लिम समाजाला पण
आता त्यांनी स्वतःला सांभाळण्याची गरज आहे. स्वतःचा संकूचित दृष्टीकोन त्यांनी
बदलला नाही तर त्याची फळं इतरांना भोगावी लागण्याच्या आधी त्यांना स्वतःला भोगावी
लागतील.
मुस्लिमांच्या
या मूर्खपणामुळे इतर धर्मांतील लोकांनाही चेव येतो आणि तेही त्याचा उपयोग धार्मिक
दहशतवाद वाढवण्यासाठी करतात हे हिंदू दहशतवाद्यांनी सिद्ध केलं आहे. त्याहीपेक्षा
चिंतेची बाब म्हणजे सनातन, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यासारख्या संस्था सौम्य
दहशतवादाची पेरणी करत आहेत ज्याचे दूरगामी परिणाम होणार आहेत. या सर्वांचा मूळ
अजेंडा हा मुस्लिम किंवा ईसाई धर्म प्रसाराला उत्तर म्हणून त्यांना रोखणं इतकाच
आहे आणि त्यासाठी हिंदूंमध्ये असूरक्षिततेची भावना जागृत करून ती कायम जागृत कशी
राहिल यावर भर देण्यातच आहे. आणि मुस्लिम दहशतवादी घटनांमुळे त्यांचं काम सोपं
होतं आणि त्यांच्या या कृत्यांकडे दूर्लक्ष होतं. मुस्लिम समाजाकडून या
दहशतवादाविरूद्ध रोखठोक उत्तर मिळत नसल्यानं त्यांचा प्रतिवाद करणंही कठीण होतं.
ही आपली जबाबदारी नाही, याचा धर्माशी किंवा सामाजिक सुधारणेशी संबंध नाही असले
दावे निव्वळ हास्यास्पद आहेत. धर्मामुळे कट्टरता वाढते आणि अन्य धर्मिय लोकांचा
द्वेष करण्याची प्रवृत्ती वाढते हे सत्यच आहे. आपला समाज रसातळाला जातोय, आपली
जगभर बदनामी होत आहे, हे पाहूनही मुस्लिम समाज सुधरत नसेल तर त्यांचच नुकसान होणार
आहे. आणि सोबत जगाचंही. कारण जगात या धर्माची लोकसंख्या सर्वाधिक आहे. सर्वदूर
त्यांचं अस्तित्व आहे आणि प्रभावही आहे.
या
हिंसाचारामागे राजकारण असेल आणि त्याच्या आडून दहशतवादी संघटनांना सत्ता संपादन
करायची असेल असा एक मतप्रवाह आहे. सिरीयातील यादवीतून हे सिद्ध होतं.
अफगानिस्तानात तालीबाँने तो प्रयत्न केला होता. इसीसच्या नावातच इस्लामिक स्टेटचा
उल्लेख आहे. तसं जर असेल तर त्यांचा कोणतीही दयामाया न दाखवता बिमोड करण्यात यायला
पाहिजे. आणि तो करताना त्यांच्या नावानं गळे फाडणा-या किंवा बंद पुकारणा-या
लोकांवरही तीच कारवाई केली गेली पाहिजे. धर्माचा मुद्दा आला की आपण जरा जास्तच
संवेदनशिल आणि सावध होतो. पण शिखांच्या खालसा प्रकरणात इंदिरा गांधींनी ज्या
प्रकारे सुवर्णमंदिरात कारवाई केली तोच आदर्श घेतला तर या मुस्लिम दहशतवादापासून
सुटका होण्याची शक्यता आहे. यात राजकारणच आहे याची शक्यता यासाठीही आहे की आजवर या
दहशतवाद्यांनी त्यांच्यासारखीच भडक भाषणं करणा-या परधर्मिय नेत्यांना मात्र लक्ष्य
केलेले नाही. बांग्लादेशात ते ज्या ब्लॉगर्सना मारताहेत ते सुधारणावादी आणि कट्टर
इस्लामच्या विरोधात बोलणारे उदार मुस्लिम किंवा हिंदू तरुण होते. भारतातही
दाभोळकर, कलबुर्गी, पानसरे अशा विचारवंतांची व उदारमतवाद्यांची हत्या करण्यात आली
जे सर्व धर्मीय सलोख्यासाठी आग्रही होते. अन्य देशांतही हेच दिसून येते. भारतात
कधी विहिंप, सनातन, मुस्लिम लीग, बजरंग दल यांच्या नेत्यांना जाणीवपूर्वक ठार
करण्यात आलंय असं दिसत नाही. जे सलोख्याच्या गोष्टी बोलतात, जे उदारमतवादी आहेत,
ज्यांना माणूसपणाच्या विचाराची कदर आहे अशांनाच मारलं जातंय. आणि अर्थातच निष्पाप
लोकांनाही ज्यांचा या सर्वांशीच काहीही संबंध नाही, ज्यांना केवळ दहशत
पसरवण्यासाठी बळी दिलं जात आहे.
मुस्लिमांना
कितीही वाईट वाटलं किंवा राग आला तरीही हे वास्तव त्यांना बदलता येणार नाही की
त्यांच्या आडमूठ्या धार्मिक स्वभावामुळे त्यांचं नुकसान होत आहे. त्यातून बाहेर
पडण्यासाठी त्यांना आपल्या धर्माची, प्रेषिताची मोकळेपणानं चिकित्सा करावीच लागेल.
ती करायची नसेल तर त्यांना आपल्या खासगी व सार्वजनिक जीवनातून हद्दपार तरी करावं
लागेल. माणूस म्हणून जगण्याची त्यांची धडपड जेवढी असेल तेवढं ते त्यांच्यासाठी व
इतरांसाठीही चांगलं ठरेल. दहशतवाद हा निव्वळ दहशतवाद असत नाही त्याला काहीतरी
अजेंडा असतो आणि धर्माच्या नावाखाली तो राबवला जात असेल तर तो धर्म आणि त्याचे लोक
त्या जबाबदारीतून मुक्त होऊ शकत नाही. हिंदूंच्या सौम्य दहशतवादाचा धोका आपल्याला
असला तरी हिंदू हे जगभरात नाहीत आणि त्यांचा एकूणच स्वभाव सौम्य असल्यानं ते उग्र
होण्याचा धोका नाही. पण मुस्लिम समुदाय हा स्वभावतःचा आक्रमक असतो आणि त्यांच्या
जागतिक अस्तित्त्वामुळे त्यांच्या कोणत्याही कृतीचे पडसाद सर्वदूर उमटतात. ही घाण
निपटून काढण्यासाठी जे प्रयत्न करताहेत त्यांच्या नृषंस हत्या केल्या जात आहेत. पण
हे युद्धच आहे आणि यात बळी जाण्याची शक्यता असली तरी तो धोका स्वीकारुनही या
समाजाला त्यासाठी लढावंच लागेल. त्यांच्या या लढाईत आमचा सहभाग असेलच पण त्याला
मर्यादा आहेत व राहतील. कारण मूळात हे प्रत्येक मुस्लिमानं स्वतः किती धर्म साक्षर
व धर्म उदार व्हावं यावर आधारीत आहे. आपल्याला सामाजिक सुधारणा हव्यात की नकोत हे
त्यांनं ठरवायचं आहे. कुराण आणि प्रेषिताच्या तावडीतून सुटायचं की नाही हे त्यांनं
ठरवायचं आहे. यांच्या पलीकडेही एक प्रचंड मोठं आणि वास्तव जग आहे हे त्यांनी
लक्षात घ्यायला हवं. असं मानण्यात त्यांचा अनादर नाही हे त्यांनी लक्षात घ्यायला
हवं. पण त्यांच्या आजच्या जगण्यात त्यांना अमर्यादीत स्थान नाही हेही त्यांना
समजायला हवं.
No comments:
Post a Comment